शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

थरारक! मोक्कातील आरोपीस पकडताना झटापट; फौजदाराला लागल्या दोन गोळ्या

By विजय पाटील | Updated: February 22, 2023 14:59 IST

फौजदारांवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले.

कळमनुरी (जि.हिंगोली) : मोक्कातील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या फौजदारावर झटापटीत दोन गोळ्या झाडल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. मात्र नेमक्या आरोपीनेच गोळ्या झाडल्या की नाही? हे अद्यापही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले नाहे.

आरोपीचे नाव बबलू हत्यारसिंग टाक (वय २८ वर्षे, रा.  इंदिरानगर कळमनुरी) हा आरोपी मोक्काचा आहे. तो कळमनुरी येथे त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी त्याला अटक करण्यासाठी फौजफाटयासह गेले होते. अटक करताना झटापटीमध्ये २ ते ३ गोळ्या माजिद यांना लागल्या. या गोळ्या फौजदार माजिद खान यांच्या डाव्या व उजव्या छातीवर लागल्या.

कळमनुरी येथे फौजदार माजिद यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोनी वैजनाथ मुंडे यांनी पाहणी केली. या प्रकारामुळे कळमनुरीत एकच खळबळ उडली आहे. घटनास्थळी तसेच रुग्णालय परिसरात बघ्यांचीही गर्दी जमली होती. 

पोलिसाकडील शस्त्रातून राउंड फायरया प्रकरणाबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयातून प्रेस नोट काढण्यात आली आहे. यामध्ये मोक्का कायद्यातील फरार आरोपी बबलूसिंग ऊर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, फौजदार शेख माजिद व कर्मचाऱ्यांचे पथक अटक करण्यासाठी गेले होते. तेथे आरोपीने पोलिस पथकावर हल्ला करून झटापट केली. पळून जाण्याचा प्रयत्न करताना व झटापट चालू असताना पोलिसाकडील शस्त्रामधून एक राऊंड फायर झाला. त्यात फौजदार माजिद जखमी झाल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHingoliहिंगोली