शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार, जखमी अवस्थेत स्वतः कार चालवत गेले रुग्णालयात

By विजय पाटील | Updated: August 1, 2023 15:46 IST

हल्लेखोरांनी समोरासमोर चार गोळ्या धाडल्या, यातील दोन गोळ्या त्यांना लागल्याची माहिती आहे

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त आलेल्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. चार पैकी दोन गोळ्या त्यांच्या पाठित लागल्याचे सांगितले जात आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

हिंगोली येथील जिल्हा परिषदेत कामानिमित्त पप्पू चव्हाण आले होते. ते ३ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून जिल्हा परिषदेच्या आवारात आले. त्यावेळी तेथे असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. ते बचावासाठी खाली वाकले. त्यामुळे दोन गोळ्या त्यांच्या पाठित घुसल्या, असे प्रत्यक्षदर्शनीने सांगितले. तर दोन गोळ्या प्रांगणात जमिनीवर पडल्याचे दिसून आले. 

या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. तर पप्पू चव्हाण यांना उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तेथेही भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने गर्दी करीत असल्याचे दिसून आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह अधिकाऱ्यांचा मोठा ताफा जमला होता.

स्वतः कार चालवत रुग्णालयातपप्पू चव्हाण यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर त्यांना पाठीत दोन गोळ्या लागल्या. तरीही त्यांनी त्याच अवस्थेत कार चालवत एक खाजगी रुग्णालय जवळ केले. या रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

नांदेडला हलविलेजखमी अवस्थेतील पप्पू चव्हाण यांना हिंगोली येथून नांदेडच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांना येथील रुग्णालयातून हलवीत असताना आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घुगे आदींसह शेकडो भाजप कार्यकर्ते रुग्णालयासमोर जमले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीBJPभाजपा