हिंगोलीतील दसरा महोत्सवात चोरट्यांचा धुमाकुळ; पाच महिलांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 17:29 IST2017-09-30T17:28:30+5:302017-09-30T17:29:02+5:30
शहरातील सुप्रसिद्ध दसरा मैदानावर दसरा साजरा करणे भाविकांना चांगलेच महागात पडत आहे. गर्दीचा फायदा घेत लहान मुलांच्या अंगावरील दागिने काढून घेणा- महिलां चोरट्यांची एक टोळीच पोलिसांनी आज दुपारी ३.३० वाजता जेरबंद केली.

हिंगोलीतील दसरा महोत्सवात चोरट्यांचा धुमाकुळ; पाच महिलांना घेतले ताब्यात
हिंगोली, दि. 30 : शहरातील सुप्रसिद्ध दसरा मैदानावर दसरा साजरा करणे भाविकांना चांगलेच महागात पडत आहे. गर्दीचा फायदा घेत लहान मुलांच्या अंगावरील दागिने काढून घेणा- महिलां चोरट्यांची एक टोळीच पोलिसांनी आज दुपारी ३.३० वाजता जेरबंद केली.
ऐतिहासिक दसरा महोत्सवात रावण दहनच्या दिवशी मोठी गर्दी होते. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय होतात. आजही दुपारी असाच प्रकार घडला. दसरा मैदानावर चोरी करणा- महिलांचे टोळके फिरत होते. लहान मुलाच्या अंगावरील दागिने काढून घेताना त्यांना पोलिसांनी पकडले. यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती फौजदार तानाजी चेरले यांनी दिली. सदर कारवाई शेख शकील, सुनील अंभोरे, जीवन मस्के, सुनील ढेंबरे आदींनी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दसरा महोत्सवात गर्दी
सर्वांचे आकर्षण असलेल्या हिंगोली येथील दसरा महोत्सवात विजया दशमीच्या दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर महोत्सवातील मनोरंजनाचे साहित्य सर्वांचेच आकर्षण ठरत होते. झोक्यामध्ये बसण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. तसेच प्रदर्शनीत लागलेल्या दुकानावरही खरेदीसाठी गर्दी झाली होती.