चोरट्यांनी लांबविले ७० हजारांचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST2021-06-04T04:23:08+5:302021-06-04T04:23:08+5:30

सेनगाव पंचायत समितीच्या पाठीमागे सुधाकर जनार्दन सरनाईक यांचे घर आहे. बुधवारी सकाळी घरातील कपाटातील सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचे ...

Thieves stole jewelery worth Rs 70,000 | चोरट्यांनी लांबविले ७० हजारांचे दागिने

चोरट्यांनी लांबविले ७० हजारांचे दागिने

सेनगाव पंचायत समितीच्या पाठीमागे सुधाकर जनार्दन सरनाईक यांचे घर आहे. बुधवारी सकाळी घरातील कपाटातील सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचे सरनाईक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती सेनगाव पोलिसांना दिली. यामध्ये सरनाईक यांच्या पत्नीचे १५ हजार रूपये किमतीचे ५ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर, तसेच त्यांचे मेव्हण्याचे खोलीतील कपाटातून १५ हजार रूपये किमतीची ५ ग्रॅमची अंगठी, १० हजार रूपये किमतीचे लहान बाळाचे वाळे, बाजूबंद व चैन तसेच ३० हजार रूपये किमतीचे ९ ग्रॅम किमतीचे कानातील सोन्याचे झुंबर असे ७० हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात सुधाकर सरनाईक यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोना पवार करीत आहेत.

Web Title: Thieves stole jewelery worth Rs 70,000