स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:53+5:302021-01-08T05:37:53+5:30
गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दिवसातून कमीत ...

स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही
गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दिवसातून कमीत कमी पाच ते सहा वेळेस वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी संतुक पिंपरी ग्रामस्थांतून होत आहे.
बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण पसरली आहे. बसस्थानक परिसरात घाण पसरल्यामुळे परिसरातील गावकरी व प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच या दुर्गंधीमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला
डिग्रस कोंढूर : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढूर गावासह शेतशिवारात वन्यप्राणी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावातील हरभरा व गव्हाच्या पिकांत वन्यप्राणी येेवून नासधूस करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यास हुसकावण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धाव घेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
स्वच्छतागृहाची दुरवस्था
हिंगोली : शहरात स्वच्छता मोहिमेतंर्गत जागोजागी लघुशंकेसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे, पण अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. तसेच अनेक नागरिक या स्वच्छतागृहात न जाता आजूबाजूला उघड्यावर लघुशंकेस बसत असल्याचे आढळून येत आहे. यासाठी या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
वातावरण बदलल्याने रुग्णसंख्या वाढली
वसमत : मागील काही दिवसांत कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण राहत आहे. या वातावरण बदलाचा परिणाम बालकांसह वयोवृद्धांवर होत आहे. शहरातील अनेक बालकांना ताप, हिवताप, थंडीताप व वयोवृद्धांचे हात-पाय दुखणे, दमा येणे, छाती दुखणे असे आजार वाढले आहे. यामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बससेवा सुरू करण्याची मागणी
केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. ते गोरेगावपर्यंत धावणारी बससेवा बंद असल्यामुळे गावासह परिसरातील नागरिकांची मोठी अडचण होत आहे. सदरील बससेवा बंद असल्यामुळे अनेकांना खासगी वाहनांनी महागडा प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर अपंग व वयोवृद्धांना कोणतीही सवलत खासगी वाहनात लागू नसल्यामुळे गावातील बससेवा सुरू करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.