जिल्ह्यात काेराेनाचा नवा रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:17 IST2021-01-13T05:17:27+5:302021-01-13T05:17:27+5:30

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली १०, वसमत २३, सेनगाव १२, कळमनुरी ४०, औंढा ७ अशा एकूण ९२ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. ...

There is no new patient of Kareena in the district | जिल्ह्यात काेराेनाचा नवा रुग्ण नाही

जिल्ह्यात काेराेनाचा नवा रुग्ण नाही

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली १०, वसमत २३, सेनगाव १२, कळमनुरी ४०, औंढा ७ अशा एकूण ९२ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. मात्र, एकही बाधित आढळला नाही. तसेच आरटीपीसीआर चाचणीतही कुणी बाधित आढळला नाही. तसेच आज बरे झालेल्यांमध्ये हनुमाननगर १, भानखेडा १, देऊळगाव१, इंचा १ तर सेनगाव येथून दोघांना वाशिम येथे संदर्भित केले आहे. कोरोनाचे एकूण ३५९३ रुग्ण झाले आहेत. ३४६८ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला एकूण ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ५५ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्ड येथे भरती असलेल्या रुग्णांपैकी ५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. एका रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यास बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. एकूण सहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आराेग्य विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: There is no new patient of Kareena in the district