शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

... तर पेट्रोल टाकून गाडी फुकून देईल, 90 लाखांची एफडी मोडणारे आमदार बांगर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:06 IST

जिल्हा परिषद अध्यक्षांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे नेण्यासाठी 108 नंबरवरील अॅम्ब्युलन्सला पाचारण करण्यात आले होते

ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्षांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे नेण्यासाठी 108 नंबरवरील अॅम्ब्युलन्सला पाचारण करण्यात आले होते. मात्र, गाडी मिळण्यास दोन तास उशीर झाल्यामुळे हिंगोलीतील शिवसेना आमदाराचा संताप झाल्याचं पाहायला मिळाले.

हिंगोली - आपल्या मतदारसंघातील नागरिकांना रेमडिसीवीर इंजेक्शनचा साठा मिळावा, यासाठी आपली 90 लाखांची एफडी मोडणाऱ्या आमदारांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, सरकारी 108 अॅम्ब्युलन्सची गाडी वेळेत हजन न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, संबंधित फोनवरील व्यक्तीला, 20 मिनिटांत गाडी हजर न झाल्यास पेट्रोल टाकून फुकून देईल, असेही ते या फोन संभाषणात म्हटल्याचे दिसून येते. 

जिल्हा परिषद अध्यक्षांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे नेण्यासाठी 108 नंबरवरील अॅम्ब्युलन्सला पाचारण करण्यात आले होते. मात्र, गाडी मिळण्यास दोन तास उशीर झाल्यामुळे हिंगोलीतीलशिवसेनाआमदाराचा संताप झाल्याचं पाहायला मिळाले. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर (Hingoli Kalamnuri Shivsena MLA Santosh Bangar) यांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. 20 मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, असा दमच बांगर यांनी भरल्याचं संबंधित ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळतं. या कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

रेमडीसीवीरसाठी मोडली 90 लाखांची एफडी

दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वीच आपली 90 लाखांची एफडी मोडून रेमडीसीवीर इंजेक्शनची मागणी केली होती. आपल्या मतदारसंघातील नागरिकांचं जीवन वाचवण्याला प्राधान्य देण्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तसेच, एका रुग्णाने रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी आमदार बांगर यांना फोन केला होता. आपल्या आईची तब्येत खालावली असून ती सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. डॉक्टरांनी रेमेडीसीवीर इंजेक्शनची मागणी केलीय, असे म्हणत रडत असलेल्या मुलाला धीर दिला. त्यानंतर, त्या रुग्णालयात 2 रेमडीसीवीर इंजेक्शनची सोयही त्यांनी करुन दिली होती. त्यामुळे, मतदारसंघात या आमदारांच्या संवेदनशीलतंच सध्या कौतुक होतंय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLAआमदारShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोलीhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद