शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या मातीची पिवळी माया! हिंगोली बनली देशाची 'हळद राजधानी', १ हजार कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:25 IST

देशातील १५ टक्के हळद आता एकट्या हिंगोलीत; दरवर्षी १५०० मे. टन हळदीची निर्यात, शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीची नांदी

हिंगोली : मागील काही वर्षांत जिल्ह्यातील हळदीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, देशातील सर्वाधिक हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोली पुढे येत आहे. परिणामी देशभरात हिंगोलीतून हळदीची निर्यात होत आहे.

हळदीच्या उत्पादनासाठी हिंगोली जिल्हा आता देशात नावारूपाला येत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात हळद उत्पादन होत असल्याने ऑक्टोबर २०२२ मध्ये जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली. दरवर्षी जिल्ह्यातून १५०० मे. टन हळदीची निर्यात होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना १ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. हिंगोली जिल्हा हा सर्वांत मोठा हळद उत्पादक प्रदेश बनला आहे.

जिल्ह्यात वसमतसह सर्वच तालुक्यांमध्ये हळदीचे उत्पादन घेतले जात असून, हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून हळदीच्या वाणांवर संशोधन केले जात आहे. प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील हळद उत्पादनात वाढ होत आहे.

वसमतची हळद देशभरात प्रसिद्धजिल्ह्यातील वसमत येथे हळद संशोधन केंद्र कार्यान्वित झाले असून, वसमतची हळद म्हणून येथील हळदीला देशभरात मागणी वाढली आहे. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने वसमत हळदीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार वसमत हळदीला ३० मार्च २०२४ रोजी जीआय टॅग देण्यात आला आहे. सांगली येथील हळदीनंतर हा दर्जा मिळविणारी ‘वसमत हळद’ ही महाराष्ट्रातील तिसरी जात ठरली आहे.

३६ प्रकारच्या वाणांची लागवडजिल्ह्यात हळदीच्या विविध वाणांची लागवड केली जातेय. त्यामध्ये सेलम, प्रतिभा आणि फुले या वाणांच्या हळदीला मोठी मागणी आहे. हळद उत्पादनातून जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत मोठी भर पडली आहे.

सर्वांत मोठा निर्यातदारजिल्ह्यात हळदीचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील हळदीला देशभरातून मागणी वाढत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा हा हळदीची राजधानी म्हणून समोर येत आहे. देशातील हळदीच्या लागवडीखालील क्षेत्राच्या १५ टक्के क्षेत्र हिंगोली जिल्ह्यातील आहे. हिंगोलीतील हळदीच्या वाणांचा अधिकाधिक प्रचार, प्रसार जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.- राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी, हिंगोली.........

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli: India's Turmeric Capital, a Billion-Rupee Hub of Yellow Gold

Web Summary : Hingoli emerges as India's leading turmeric producer, driving a billion-rupee economy. High yields and exports, facilitated by a research center, have earned the region national recognition. Vasmat turmeric received a GI tag, boosting its popularity and marking it as Maharashtra's third distinctive variety.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी