शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार रस्त्यालगतच्या शेडमध्ये शिरली; चिरडून आजोबांचा जागीच मृत्यू, नातू गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 12:34 IST

रस्त्यालगतच्या शेडमध्ये आजोबा आणि नातू झोपले होते

सेनगाव: शहरानजीक सेनगाव-रिसोड रस्त्यावर भरधाव कार रस्त्यालगतच्या एका शेडमध्ये शिरून भीषण अपघात झाला. यात शेडमध्ये झोपलेल्या एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज पहाटे असून पोलिसांनी कारमधील चौघांना ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून हिंगोलीकडे एक कार (क्रमांक एम एच 16-एटी 6710 ) भरधाव वेगाने जात होती. सेनगावजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या शेडमध्ये घुसली. यावेळी शेडमध्ये झोपलेले नामदेव हागे यांचा कारखाली चिरडून यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा नातू गोपाल हा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून गोपाल यास उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातDeathमृत्यू