घरगुती भांडण विकोपाला गेले, संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीला संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 13:25 IST2022-03-07T13:25:29+5:302022-03-07T13:25:46+5:30

पती फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

The domestic quarrel escalated, with the angry husband ending his wife with a sharp weapon | घरगुती भांडण विकोपाला गेले, संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीला संपवले

घरगुती भांडण विकोपाला गेले, संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीला संपवले

वसमत( हिंगोली): पिंपळाचौरे शिवारातील शेतातील आखाड्यावर सोमवार रोजी सकाळी पती पत्नीच्या घरगुती भांडणात पतीने कत्तीने पत्नीच्या गळयावर,तोंडावर व कमरे वर सपासप वार करित पत्नीचा खून केला. घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.पती खुन करुन फरार झाला.

वसमत तालुक्यातील पिपंळाचौरे शिवारातील शेतातील आखाड्यावर ७ मार्च सोमवार रोजी सकाळी ७ वा पती श्रावण चौरे व पत्नी पार्वतीबाई (३५ ) या दोघांचे घरगुती कारणावरुन भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने संतापात पतीने धारधार कत्तीने पत्नीच्या गळयावर,तोंडावर व कंबरेवर सपासप वार केले. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पतीने घटनास्थळा वरुन पळ काढला. 

घटनेची माहीती मिळताच वसमत ग्रामीणचे सपोनि विलास चवळी,फौजदार ज्ञानेश्वर शिंदे,अजय पंडित,आंबादास विभुते,गजानन सावळे यांच्यासह आदि कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.पती श्रावण चौरे यांचा शोध पोलीस घेत होते.मयत महिलेस तिन मुली आहेत.

Web Title: The domestic quarrel escalated, with the angry husband ending his wife with a sharp weapon