बनावट पी.आर. कार्ड तयार करून विकला मोकळा भूखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST2021-08-29T04:29:07+5:302021-08-29T04:29:07+5:30

हिंगाेली शहरातील शिवाजीनगरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा संत ज्ञानेश्वर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम शंकरराव जोगदंड यांनी तक्रार दिली. यावरून ८ ...

Texture P.R. Vacant plot sold by making cards | बनावट पी.आर. कार्ड तयार करून विकला मोकळा भूखंड

बनावट पी.आर. कार्ड तयार करून विकला मोकळा भूखंड

हिंगाेली शहरातील शिवाजीनगरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा संत ज्ञानेश्वर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम शंकरराव जोगदंड यांनी तक्रार दिली. यावरून ८ एप्रिल २०२१ पासून २७ ऑगस्टदरम्यान पंडित नागोराव लाडके (राजूरकर), विवेक पंडितराव राजूरकर (दोघे रा. जालान नगर, पैठण रोड, औरंगाबाद), राजेश रतनलाल शर्मा (रा. मारवाडी गल्ली, हिंगोली), प्रकाश यलप्पा पवार (रा. सरस्वतीनगर, हिंगोली) याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पंडित लाडके व विवेक राजूरकर या दोघांनी संत ज्ञानेश्वर गृहनिर्माण संस्थेचा प्लॉट क्र. ३ या मोकळ्या जागेचे खोटे बनावट पी.आर. कार्ड तयार करून राजेश शर्मा यांना खरेदीखत करून देत संस्थेची फसवणूक केली. तसेच याबाबत विचारणा केली असता, राजेश शर्मा व प्रकाश पवार याने शिवीगाळ करत धमकी दिल्याचे हिंगोली शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाधर बनसोडे करीत आहेत.

Web Title: Texture P.R. Vacant plot sold by making cards