शिक्षकांची दिवाळी वेतनाविना
By Admin | Updated: October 22, 2014 13:36 IST2014-10-22T13:36:07+5:302014-10-22T13:36:07+5:30
तालुक्यातील ६५0 प्राथमिक शिक्षकांचे मागील महिन्याचे वेतन न झाल्याने वेतनाविना यंदाची दिवाळी साजरी करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.

शिक्षकांची दिवाळी वेतनाविना
औंढा नागनाथ : तालुक्यातील ६५0 प्राथमिक शिक्षकांचे मागील महिन्याचे वेतन न झाल्याने वेतनाविना यंदाची दिवाळी साजरी करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकसंख्या ६५0 आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सुद्धा कोषागार कार्यालयाकडून मागील महिन्यांचे वेतन देण्यास टाळाटाळ झाली. या वेतनावरच शिक्षक आपली दिवाळी साजरी करणार होते; परंतु शिक्षण विभागाने मात्र दिवाळी फेस्टीव्हल देऊन शिक्षकांना गावाकडे परत जाण्यापुरता आर्थिक आधार दिला आहे. ऐन दिवाळी वेतन न मिळाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने संतोष पवार, शाम माने, इरशाद पठाण, विजय बांगर, शेषराव बांगर, किरण राठोड आदी पदाधिकार्यांनी लवकर देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)