'खोटा गुन्हा मागे घ्या'
By Admin | Updated: October 22, 2014 13:42 IST2014-10-22T13:42:02+5:302014-10-22T13:42:02+5:30
केल परवानाधारक भारत झाडुजी पडघान हे डिलरकडून रॉकेल नेत असताना त्यांचा ऑटो बीट जमादार लेकुळे यांनी अडवून दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

'खोटा गुन्हा मागे घ्या'
हिंगोली : शहराच्या काही अंतरावरच असलेल्या बळसोंड येथे रॉकेल परवानाधारक भारत झाडुजी पडघान हे डिलरकडून रॉकेल नेत असताना त्यांचा ऑटो बीट जमादार लेकुळे यांनी अडवून दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरु केले आहे.
बळसोंड येथे परवानाधारक पडघान हे २४ ऑगस्ट रोजी ऑटोने ६00 लिटर रॉकेल वाटपासाठी बळसोंडमार्गे नेत होते. त्यांचा ऑटो बीट जमादार लेकुळे यांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तसेच तहसीलदार व पुरवठा विभागाने सुध्दा त्यांच्या रास्तभाव दुकानाचा परवाना रद्द केल्याने तो परत देण्यासाठी त्यांनी मंगळवारी उपोषण सुरु केले आहे.
चौकशीचे आदेश सदर गुन्हयाची फेरचौकशी करुन उपोषणकर्त्यास उपोषणापासून परावृत करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एन.अंबिका यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)