साखरेचा गोडवा कायम; तीळाचे भाव वधारलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST2020-12-25T04:24:18+5:302020-12-25T04:24:18+5:30
मकरसंक्रात हा महिलांसाठी महत्वाचा सण आहे. संक्रांतीमुळे नातेसंबंध घट्ट बनते. या दिवशी महिला एक़मेकींना वाण भेट देतात. तीळ, साखर, ...

साखरेचा गोडवा कायम; तीळाचे भाव वधारलेलेच
मकरसंक्रात हा महिलांसाठी महत्वाचा सण आहे. संक्रांतीमुळे नातेसंबंध घट्ट बनते. या दिवशी महिला एक़मेकींना वाण भेट देतात. तीळ, साखर, गुळाचे भाव कमी व्हायला पाहिजेत.
- प्रतीमा तांबोरे, गृहिणी,जिजामातानगर
मकर संक्रांत अजून पंधरा-वीस दिवसांवर आहे. त्यामुळे तीळ, गुळ आणि साखरेच्या बाबतीत अजून तरी काही सांगता येत नाही. कोरोनामुळे दुकानावर ग्राहकी कमी झालेली पहायला मिळत आहे.
- श्रीकांत काबरा, व्यापारी
तिळाचा भाव दीडशे रुपये किलो
मकरसंक्रांतीला तिळाचे भाव नेहमी उतरतात. परंतु, आजमितीस तिळाचे भाव हे १५० रुपये किलो आहेत. त्यामुळे अजून किती भाव वाढतील हे सांगणे कठीणच आहे.
गूळ ४० रुपये किलो
गूळ नेहमी २५ ते ३० रुपये किलोने मिळतो. परंतु, सध्या गूळ ४० रुपये किलोने दराने बाजारात विक्री होत आहे. मकर संक्रांतीला भाव वाढण्याची शक्यता आहे.
साखरेचे भाव
साखरेने गोडवा कायम ठेवलेला पहायला मिळत आहे. मकरसंक्रांत वीस दिवसांवर असली तरी सध्या साखर ३७ रुपये किलोने विकली जात आहे. संक्रांतीला साखरेचा भाव वाढेल की उतरेल हे मात्र आजरी सांगता येणे कठीणच आहे.