माणुसकीच्या भिंतीचा गरजूंना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:52 IST2018-12-08T23:51:31+5:302018-12-08T23:52:46+5:30
शहरातील स्टेट बँक हैदराबाद परिसरात पिपल्स बँकेसमोर योग विद्या धामच्या वतीने माणुसकीची भिंत आगळा-वेगळा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना कपडे वाटप केले जात आहेत.

माणुसकीच्या भिंतीचा गरजूंना आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील स्टेट बँक हैदराबाद परिसरात पिपल्स बँकेसमोर योग विद्या धामच्या वतीने माणुसकीची भिंत आगळा-वेगळा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना कपडे वाटप केले जात आहेत.
नको असलेले आणून द्यावे आणि हवे असलेले घेऊन जावे या अनुषंगाने हा उपक्रम ८ ते ९ डिसेंबर या कालावधीत राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात येत आहेत. तसेच वापरण्यात येण्यासारखे परंतु घरात त्या कपड्यांचा वापर होत नसलेले सर्व प्रकारचे कपडे गरजूंना उपयुक्त असतील तर ते आणुन देण्याचे आवाहन योग विद्या धामच्या वतीने करण्यात आले आहे. हा उपक्रम सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत आहे. नागरिकांनी यात सहभागी होऊन गरजूंना प्रोत्साहित करावे.