सेनगावात रविवारी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST2021-07-15T04:21:44+5:302021-07-15T04:21:44+5:30

कोरोना महामारीचे संकट असून, यादरम्यान रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन ...

Sunday blood donation camp in Sengaon | सेनगावात रविवारी रक्तदान शिबिर

सेनगावात रविवारी रक्तदान शिबिर

कोरोना महामारीचे संकट असून, यादरम्यान रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार राजू पाटील नवघरे यांच्या हस्ते होणार आहे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह माजी जि.प. उपाध्यक्ष तथा विधानसभा रा.काँ. अध्यक्ष अनिल पतंगे, माजी नगरसेवक उमेश देशमुख, रा.काँ. युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले, माजी नगराध्यक्ष संदीप बहिरे, महिला अध्यक्ष वैशाली वाघ, संदीप देशमुख, व्ही.डी. देशमुख, अध्यक्ष पत्रकार संघ शिवाजी देशमुख, युवक रा.काँ. तालुका अध्यक्ष स्वप्नील देशमुख, नीलेश घाटोळकर, दीपक देशमुख, राजकुमार देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी आपल्या नावाची नोंदणी उमेश देशमुख, परमेश्वर इंगोले, राजकुमार देशमुख यांच्याकडे करावी.

Web Title: Sunday blood donation camp in Sengaon