लोकडाऊनमुळे गावी परतलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 11:15 IST2020-09-08T11:13:20+5:302020-09-08T11:15:35+5:30
शेतात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली

लोकडाऊनमुळे गावी परतलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अस्पष्ट इसापूर रमना येथील घटना
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील ईसापुर रमना गावामध्ये एका 26 वर्षीय तरुणाने गावाशेजारील स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
महेंद्र वाढवे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्याला कामानिमित्त राहायचा. कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी तो गावी परतला होता. दरम्यान, रात्री दोन वाजेच्या सुमारास घरून निघून गेला. त्याचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे. अद्याप तरी याप्रकरणी पोलिसात मृत्यूची नोंद झालेली नाही. ईसापुर रमना हे गाव बासंबा पोलीस ठाणे हद्दीत आहे.