शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विषय शिक्षक दर्जोन्नतीत समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:28 AM

जिल्ह्यातील विषय शिक्षकांसाठी होकार दिलेल्या शिक्षकांना १९ व २० नोव्हेंबर रोजी समुपदेशानाने पदस्थापना देण्यात येणार आहे. विषय शिक्षकांनी होकार दिलेल्या शिक्षकांनी जि.प. सभागृह हिंगोली येथे उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विषय शिक्षकांसाठी होकार दिलेल्या शिक्षकांना १९ व २० नोव्हेंबर रोजी समुपदेशानाने पदस्थापना देण्यात येणार आहे.विषय शिक्षकांनी होकार दिलेल्या शिक्षकांनी जि.प. सभागृह हिंगोली येथे उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ६ वी ते ८ वीच्या वर्गावरील होकार दिलेल्या पात्र शिक्षकांना समुपदेशन प्रक्रियेद्वारे विषय शिक्षकासाठी पदोन्नती दिली जाणार आहे. याबाबत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी १७ नोव्हेंबर रोजी पत्र काढून शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार व अधिनियम २००९ मधील तरतुदीप्रमाणे उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान भाषा व सामाजिक शास्त्र या विषय संवर्गातील शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया समुपदेशनाने जिल्हास्तरावर दोन दिवस होणार आहे. सदरील समुपदेशनच्या दिवशी कोणीही पात्र शिक्षक गैरहजर राहू नये, याची काळजी घेण्यात आली आहे. पात्र शिक्षक समुपदेशनास अनुपस्थित राहिला असेल तर त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार त्यांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक हित लक्षात घेता प्रशासकीय दृष्ट्या पदस्थापना देण्यात येणार आहे. पात्र शिक्षकांना कार्यरत शाळेवरच जागा रिक्त असेल तर तेथेच पदस्थापना देण्यात येणार आहे. कार्यरत शाळेवर विषय शिक्षकाची जागा रिक्त नसेल केंद्रांतर्गत शाळेत पदस्थापना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात विषय शिक्षकांच्या ६७२ जागा रिक्त आहेत. होकार दिलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात येणार आहे.९३४ शिक्षकांनी विषय शिक्षकाच्या दर्जोन्नतीसाठी होकार दिलेला आहे. किती शिक्षक दर्जान्नतीला होकार व नकार देतात, हे समुपदेशनानंतरच कळणार आहे. जिल्ह्यातील ३७० शिक्षकांना जिल्ह्यांतर्गत व बदली प्रक्रियेत रॅन्डम राऊंडने पदस्थापना कोठेही देण्यात आल्या. पदोन्नतीने तरी आपल्या तालुक्यात जाता येईल, यासाठी रॅन्डम राऊंडच्या शिक्षकांनी विषय शिक्षकासाठी होकार दिला होता. परंतु कार्यरत शाळेमध्येच दर्जाेन्नती केली जाणार असल्याने अनेक शिक्षकांचा हिरमोड झाला. जिल्हा स्तरावरून समुपदेशानाने विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या करा, या मागणीसाठी शिक्षकांनी अनेक आंदोलने केली. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ग्रामविकास विभागाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार विषय शिक्षकांच्या दर्जोन्नत्या होणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रzpजिल्हा परिषद