सायकलवरून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 19:16 IST2021-12-18T19:16:41+5:302021-12-18T19:16:56+5:30
या अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरातच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती.

सायकलवरून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले
कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे शाळा सुटल्यावर घराकडे जात असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याला ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी २. २५ मिनिटाच्या सुमारास घडली आहे. हा विद्यार्थी इयत्ता पाचवी वर्गात शिकत हाेता.
कुरुंदा येथील नरहर कुरुंदकर विद्यालयातील पाचवी वर्गात शिकणारा विद्यार्थी संकेत महाजन वय ११, हा शाळा सुटल्यानंतर गावाकडे सायकलवरून जात हाेता. यादरम्यान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ समोरून येणारा ट्रकने या विद्यार्थ्यांला चिरडल्याने संकेतचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्या बालकाच्या सायकलचा चुराडा झाला होता. ट्रक क्रमांक आर. जे.२१ सी. बी ७८७७ हा हळद घेऊन जात हाेता.
या अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरातच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. वेळीच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी कुरुंदा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू हाेती. या घटनेमुळे कुरूंदा गावात शोककळा पसरली होती.