शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिष्याने गुरूंना केले चितपट! वसमतच्या मतदारांचा राजू नवघरेंना कौल, सलग दुसऱ्यांदा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:27 IST

महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

वसमतविधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. राजू नवघरे यांनी २९ हजार ४३२ मतांची आघाडी घेत महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव केला. अखेरपर्यंत अटीतटीच्या निवडणुकीत शिष्याने गुरुंना पराजीत केले, अशी चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळत आहे. 

वसमत विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. ३ लाख ७६५ पैकी २ लाख ४० हजार ७३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून परभणी मार्गावरील आयटीआय येथे मतमोजणीस सुरुवात झाली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार आ. नवघरे यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीपर्यंत मतांची आघाडी त्यांच्याकडे होती. वसमत शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांना जवळपास ७ हजार मतांची मोठी आघाडी मिळाली त्यानंतर त्यांना मताधिक्य मिळवता आले नाही. महायुतीचे उमेदवार आ. राजू नवघरे यांनी योग्य नियोजन व कार्यकर्त्यांची शेवटच्या टप्यात बांधणी केली. त्यामुळे तर त्यांना विजय गाठता आला. आ. नवघरे यांचे गुरु जयप्रकाश दांडेगावकर यांचा त्यांनी पराभव करत अखेर त्यांना चितपट केले.

१५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक  जाहीर झाली. तेंव्हापासून महायुती व महाविकास आघाडीने प्रचारात वेग घेतला होता. ४ नोव्हेंबर रोजी अनेकांनी अर्ज मागे घेतल्यांतर वसमत मतदारसंघात जयप्रकाश दांडेगावकर, आ. राजू नवघरे, गुरु पादेश्वर महाराज यांच्यामध्ये तिरंगी लढत होती. परंतु ज्यावेळी प्रचार संपला. त्यानंतर मात्र दांडेगावकर व नवघरे यांच्यापैकी एक उमेदवार विजयी उमेदवार विजयी होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. 

मतदारांनी आ राजू नवघरे यांना दिला कौल...आतापर्यंत आ. नवघरे यांनी मतदारसंघात सिंचन,रस्ता,गाव पातळीवरील कामे,तसेच नेत्र शस्त्रक्रिया,गरजुना मदत,हाकेवर हजर होणे यासह आदी कामे केली आहेत. या कामाचे फलीत विधानसभेत सलग दुसऱ्या विजयातून आ. नवघरे यांना मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मतदारांतून सुरु आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbasmath-acवसमत