बोरजा फाट्यावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:42 IST2018-04-22T00:42:32+5:302018-04-22T00:42:32+5:30
तालुक्यातील बोरजा फाट्यावर कठुआ, उन्नाथ, सुरत, पटणा, बालासोर, ग्रेडर, नोएडा बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी दीड तास रास्ता रोको आंदोलन करून औंढा येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या मार्फत राष्टÑपतींना निवेदन देण्यात आले.

बोरजा फाट्यावर रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील बोरजा फाट्यावर कठुआ, उन्नाथ, सुरत, पटणा, बालासोर, ग्रेडर, नोएडा बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी दीड तास रास्ता रोको आंदोलन करून औंढा येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या मार्फत राष्टÑपतींना निवेदन देण्यात आले.
अत्याचार आणि त्यानंतर हत्या यामुळे देशात दहशत पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सांप्रदायकाडून रास्तारोको आंदोलन करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर जगदीश दीपके, सुनील बलखंडे, सिद्धार्थ कुर्रे, यु.जी. नवले, राजरतन पंडित, प्रकाश काशिदे, अरविंद पुंडगे, शिवाजी गडदे, नारायण तांबारे, साहेबराव गरपाळ, राहूल पुंडगे, सचिन खाडे, मोहन दीपके, अब्दुल हाफीज, चरण खिल्लारे, रवी झुंझुडे, कैलास काशिदे, महेंद्र दीपके, पवनकुमार ठोके, संदीप काशिदे, संतोष खाडे, वसंत बगाटे, सिद्धार्थ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व तरूणांची उपस्थिती होती.
बोरजा फाट्यावर दीड तास झालेल्या रास्तारोकोमुळे औंढा बसस्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. औंढा नागनाथ ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवेदनातील सर्व बाबी शासनाकडे पाठवण्यासाठी तहसील प्रशासन बांधील असल्याचे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी सांगितले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आंदोलनकर्त्यांनीही सहकार्य केले.