चोरलेली ५० हजारांची दारू लपविली महावितरणच्या पडक्या खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:13+5:302021-04-18T04:29:13+5:30

हिंगोली शहरातील जुना मोंढा भागात देशी दारूचे दुकान आहे. १६ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दुकान बंद करून खासगी ...

Stolen liquor worth Rs 50,000 was hidden in a dilapidated room of MSEDCL | चोरलेली ५० हजारांची दारू लपविली महावितरणच्या पडक्या खोलीत

चोरलेली ५० हजारांची दारू लपविली महावितरणच्या पडक्या खोलीत

हिंगोली शहरातील जुना मोंढा भागात देशी दारूचे दुकान आहे. १६ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दुकान बंद करून खासगी नोकर घरी गेला होता. १७ एप्रिल रोजी सकाळी ७.३०च्या सुमारास दुकानात पाहणी केली असता दुकानाचे शटर तोडल्याचे लक्षात आले. आतमध्ये पाहणी केली असता दुकानातून देशी दारूच्या ४८ बाटल्या असलेले २२ बॉक्स व सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सूर्यकांत सुदामराव गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

चाेरटे पोलिसांच्या जाळ्यात

दरम्यान, या घटनेतील संशयित आरोपी शहरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पो.उप.नि. नितीन केणेकर, कांबळे, गंगाधर जोगदंड यांच्या पथकाने तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले. यावेळी चोरट्यांनी चोरी केल्याची कबुली दिली असून मुद्देमाल महावितरण कार्यालयाच्या एका पडक्या खोलीतून ताब्यात घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत मुद्देमाल जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Stolen liquor worth Rs 50,000 was hidden in a dilapidated room of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.