आडगाव रंजे येथे श्रीसंत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:33+5:302021-02-05T07:55:33+5:30

आडगाव रंजेबुवा येथे १३ वर्षापासून श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा गावकऱ्यांच्यावतीने साजरा करण्यात येताे. महाराष्ट्रात ...

Sreesanth Tukaram Maharaj Birth Anniversary Celebration at Adgaon Ranje | आडगाव रंजे येथे श्रीसंत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा

आडगाव रंजे येथे श्रीसंत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा

आडगाव रंजेबुवा येथे १३ वर्षापासून श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा गावकऱ्यांच्यावतीने साजरा करण्यात येताे. महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी हा साेहळा साजरा केला जातो. त्यामध्ये आडगाव रंजेबुवा येथे सकाळी ९ वाजता हनुमान मंदिरापासून पालखी काढण्यात आली. महिलांनी घरासमोर रांगोळी काढून पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले. या पालखीमध्ये भजनी मंडळ बाल भजनी मंडळ पुरुष व महिलांची संख्या लक्षणीय होती. संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून पालखीचा समारोप हनुमान मंदिरात झाला. त्यानंतर दुपारी बारा वाजता संत तुकाराम महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जन्मोत्सवावेळी गावातील महिलांनी श्री संत तुकाराम महाराजांचा पाळणा गायीला तसेच याठिकाणी गोरखनाथ महाराज (सोलापूर) यांचे प्रवचन झाले. त्यानंतर या ठिकाणी सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. फाेटाे नं.०५

Web Title: Sreesanth Tukaram Maharaj Birth Anniversary Celebration at Adgaon Ranje