आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:42 IST2018-05-25T00:42:50+5:302018-05-25T00:42:50+5:30
येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी पथके तपासकामी तैनात केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली.

आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी पथके तपासकामी तैनात केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली.
पोलीस भरती घोटाळ्यात एकूण २६ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी मदने, पोनि अशोक मैराळ या प्र्रकरणाचा तपास करीत आहेत. उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंगही जप्त केली आहे. यातील सहा जवान व दोन आॅपरेटर एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. २३ मे रोजी आरोपींची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. या सहा आरोपींच्या कोठडीत न्यायालयाने तपासकामी वाढ केली असून २८ मेपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. आॅपरेटर शिरीष अवधूत, स्वप्नील साळुंके व इतर सहा जणांचा समावेश आहे.