शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन आवक मंदच, हमी केंद्रही ओसच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:14 IST

यंदा दीपावलीनंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल घराबाहेर काढत नसल्याने मोंढ्यातील आवक मंदच आहे. शिवाय मोंढ्याबाहेरही खरेदीला मुभा असल्याचा परिणामही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर हमीभाव केंदापेक्षा बाहेरचे दरच वाढल्याने तेही ओस पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा दीपावलीनंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल घराबाहेर काढत नसल्याने मोंढ्यातील आवक मंदच आहे. शिवाय मोंढ्याबाहेरही खरेदीला मुभा असल्याचा परिणामही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर हमीभाव केंदापेक्षा बाहेरचे दरच वाढल्याने तेही ओस पडले आहेत.मागील काही वर्षांपासून शेतीमालाला भाव नसल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येत आहे. हमीभावापेक्षाही कमी दराने मोंढ्यात मालाची खरेदी होत असल्याची ओरड करून शेतकरी नाफेडच्या हमीभाव केंद्रावर गर्दी करीत होते. मात्र शेतकऱ्यांना त्याचा अनुभव फारसा चांगला आला नाही. यात मालाची आॅनलाईन नोंदणी, त्यानंतर माल विक्रीसाठी प्रतीक्षा, त्यानंतर धनादेशासाठी चकरा असा तीन ते चार महिन्यांचा काळ जात होता. त्यामुळे या केंद्राकडे पाठ फिरवून अनेकांनी मोंढ्यात कमी दराने आपला माल विकणे पसंत केले होते. यंदा मात्र दुष्काळामुळे चित्र बदलले आहे. हरभºयाचे दर तर आता पुढील हंगाम येण्यापूर्वीच वधारलेले आहेत. सोयाबीनही हमीभावापेक्षा जास्त दराने विकले जात आहे. ३ हजार ५00 रुपयांपर्यंतचा दर मिळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आॅईल मिल, बियाणे महामंडळ व व्यापारी अशा तिन्हींकडून मागणी असल्याने शेतकºयांना अजून दरवाढीची अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी काहीकाळ वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. तूर्तही शेतकरी आपली तात्पुरती गरज भागविण्याइतकाच माल मोंढ्यात आणत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या दिवसांत रोज जवळपास आठ हजार क्विंटलपर्यंत येणारा माल आता दीड ते दोन हजार क्विंटलांवर आला आहे. बहुतांश भागात दुष्काळामुळे उताराही घटलेला आहे. यामुळे यंदा व्यापाºयांतही स्पर्धा व निराशा दोन्ही असल्याचे चित्र दिसून येत आहे.यंदा हमीभाव केंद्रांवर माल देणाºया शेतकºयांना आठ दिवसांत रक्कम मिळेल, अशी प्रणाली शासनाने निर्माण केली. मात्र तेथील दरच कमी असल्याने शेतकरी थेट मोंढ्याकडे वळला आहे. त्यामुळे नोंदणी केलेला मालही हमीभाव केंद्रावर जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अचानकच ही परिस्थिती बदलल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड