लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मसोड येथील शेतातील आखाड्यावरील सोयाबीनचे ९ पोते चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली.कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील गोकुळ लक्ष्मीनाराण तोष्णीवाल यांच्या शेतातील आखाड्यावर असलेले सोयाबीनचे नऊ पोते चोरट्यांनी लंपास केले. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी गोकुळ तोष्णीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गजू राजाराम सातव व इतर इसमाविरूद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना गुव्हाडे करीत आहेत.चालकांवर कारवाईहिंगोली - अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. पोलिसांनी ४१ वाहनचालकांकडून १० हजार रूपये दंड वसूल केला.
शेतातील सोयाबीनचे ९ पोते लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:19 IST