शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

निधी परत जाऊ नये म्हणून लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:06 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कर्जमाफीनंतर ३0 टक्क्यांची कात्री लागणार असल्याने काही विभागांनी आपली आहे तीच कामे पूर्ण करून आळशी भूमिका घेतली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कर्जमाफीनंतर ३0 टक्क्यांची कात्री लागणार असल्याने काही विभागांनी आपली आहे तीच कामे पूर्ण करून आळशी भूमिका घेतली होती. मात्र तेवढ्यात निधी परत आल्याने अशा विभागांचा निधी परत येण्याची शक्यता गृहित धरून लोकप्रतिनिधी मात्र अशा निधींतून कोणती कामे घ्यायची यासाठी चाचपणी करीत आहेत. तर दुसरीकडे अधिकारी निधी वर्ग करून घेण्याचे प्रस्ताव दाखल करताना दिसत आहेत.हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारणच्या वार्षिक आराखड्यात ९५.६७ कोटींची तरतूद मंजूर होती. यापैकी ६१.१३ कोटी एवढी रक्कम विविध विभागांना मागील महिन्यातच वितरित केली होती. मात्र अजून जवळपास ३५ कोटी शिल्लक आहेत. शिल्लकपैकी जवळपास ६ कोटींपेक्षा जास्त रक्कम नव्याने वितरित झाली. यात पूरनियंत्रणला वाढीव ८ लाख, शालेय शिक्षणचे ३.१९ कोटी, क्रीडा-७६ लाख, तांडा वस्ती सुधारला १.0२ कोटी आदी बाबींचा समावेश आहे. तर इतर काही विभागांचे निधी मागणीचे पत्र आता दाखल होत आहेत. त्यातही काही विभागांना मात्र अजूनही नियोजन विभागाकडूनच निधीबाबत विचारणा करण्याची वेळ येत आहे. यामुळे अशा विभागांचा निधी परत येतो की काय, अशीही भीती आहे. तो आल्यास ऐनवेळी धावपळ न होण्यासाठी लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध योजनांचे प्रस्ताव तयार करताना दिसत आहेत. यासाठी वर्षभरात कधीच न दिसणारी नेतेमंडळीही आता नियोजन विभागाच्या घिरट्या घेताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात बीडीएसवर किती निधी आला त्यावरूनच निधी वितरणाची गती दिसणार आहे. यापूर्वी केवळ २.२५ कोटींच्या निधीचे पुनर्विनियोजन प्रशासनाने केलेले आहे. आता नव्याने यात खरेच वाढ होते की कसे, हा प्रश्नच आहे. कृषी संलग्न सेवांसाठीची १५.९७ पैकी १0.९९ कोटींची रक्कम वितरित झाली. फलोत्पादन, सहकार, पीक व पशुसंवर्धनासाठीचा निधी अजून वितरितच नाही.ग्रामविकासाचे ३.४५ कोटी वितरित झाले. तर पाटबंधारे व पूरनियंत्रणच्या ५.९५ कोटींपैकी ३0 लाख वितरित झाले. सामाजिक सेवांच्या २५.६४ कोटींपैकी २0 कोटीच वितरित झाले. यात आरोग्याचे ३.८३ पैकी १.८६, नगविकासचे ६.८८ पैकी २.५९ कोटीच वितरित झाले आहेत. उर्जा विकासाचे ३ पैकी २ कोटी, रस्ते, पूल व इमारतींचे १५.0४ पैकी १0.२४ कोटी, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासाचे ६.२६ पैकी ३.७५ कोटी, इतर योजनांचे १.२८ कोटीपैकी ३६ लाख, नावीन्यपूर्ण योजनेचे ४.७८ कोटींपैकी २७ लाख वितरित झाले. यातील अनेक विभागांनी वाढीव निधीचे नियोजन केले. मात्र मागणीच केली नाही. चार-दोन विभागच निधी परत करू शकतील, असे चित्र आहे. मात्र तरीही पुढाऱ्यांची धावपळ सुरूच आहे.

टॅग्स :collectorतहसीलदारMONEYपैसा