...म्हणून एफएक्यू केंद्राची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:11 AM2018-09-12T00:11:42+5:302018-09-12T00:11:58+5:30

हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी आता एफएक्यू व नॉन एफएक्यू दर्जाचा माल वेगवेगळ्या ठिकाणी विकण्याचे आवाहन शेतक-यांना केले आहे.

 ... so the amount of FAQ Center | ...म्हणून एफएक्यू केंद्राची मात्रा

...म्हणून एफएक्यू केंद्राची मात्रा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी आता एफएक्यू व नॉन एफएक्यू दर्जाचा माल वेगवेगळ्या ठिकाणी विकण्याचे आवाहन शेतक-यांना केले आहे. दर्जाची तपासणीही शेतक-यांनीच करून घ्यायची असून त्यासाठीची यंत्रणा तर आली मात्र कार्यान्वित नाही. त्यानंतरही ती खरेच तपासणी करून देईल का, हा प्रश्नच आहे.
हिंगोलीच नव्हे, राज्यात सर्वत्रच हमीभावाचा मुद्दा चिघळला होता. व्यापा-यांनी मोंढ्यात खरेदी बंद केली होती. ऐन सणासुदीत शेतकरीही अडचणीत आले होते. एकीकडे हमीभावाने खरेदी न केल्यास व्यापाºयांवर गुन्हे दाखल करण्याचा मंत्रिमंडळ निर्णय झाला तर दुसरीकडे हे प्रकार सुरू झाले. त्यानंतर तोडगा काढण्यासाठी मुंबईपर्यंत बैठका झाल्या. यानंतर बाजार समितीने एफएक्यू दर्जाचा माल शासनाच्या नाफेडकडील हमीभाव केंद्रावर विक्री करावा व नॉन एफएक्यू दर्जाचा माल भुसार मोंढ्यात विकावा, असे आवाहन केले.
या मालाची प्रतवारी तपासणी करण्याचे यंत्र नाफेडचे केंद्र सुरू होण्याच्या ठिकाणी संत नामदेव मार्केट यार्डात आले. मात्र ते कधी सुरू होणार? त्यासाठीच्या मनुष्यबळाची जुळवाजुळव झाली का, याचा कुणालाच पत्ता नाही. सध्या हे केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचे तेवढे सांगितले जात आहे.
शेतकºयांचीच गोची : हमीभाव अधांतरीच
शासनाच्या हमीभाव केंद्रावर उच्च प्रतीचा मालच खरेदी होणार आहे. त्यामुळे इतर शेतकºयांचा माल चांगल्या प्रतीचा असला व त्याला अत्यंत निकड असल्याने नाफेडच्या रांगेत उभे राहता येत नसेल तर तो खराब समजूनच मोंढ्यात व्यापारी खरेदी करतील. या निर्णयामुळे तर शेतकºयांची पुरती माती होणार आहे.
शासनाने एक प्रकारे आयते कोलीत हाती दिल्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. जर एखाद्या शेतकºयाने हमीभाव केंद्रावर माल तपासला तरीही व्यापारी कसा भरवसा ठेवणार, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा सुळावर चढणार आहे.
आज भुसार मोंढ्यात ३0, तूर ५0, उडीद २५, मूग ३00, गहू ६0 तर ज्वारी २0 क्विंटल आली. यात सोयाबीन-३३८0, तूर ३६00, उडीद ३२00, मूग ५६00, गहू-२१५५, ज्वारी १५८0 रुपये हे कमाल भाव होते.

Web Title:  ... so the amount of FAQ Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.