तस्करांचीही लॉकडाऊन तयारी; वसमतमध्ये १०० गोण्यांमध्ये साठवलेला ४३ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 01:08 PM2021-04-16T13:08:36+5:302021-04-16T13:08:57+5:30

या प्रकरणी मुजाहित पठाण आणि   जाफर सय्यद बाबु (रा. वसमत) यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

Smugglers also prepare for lockdown; 41 lakh gutka stored in 100 sacks seized in Wasmat | तस्करांचीही लॉकडाऊन तयारी; वसमतमध्ये १०० गोण्यांमध्ये साठवलेला ४३ लाखांचा गुटखा जप्त

तस्करांचीही लॉकडाऊन तयारी; वसमतमध्ये १०० गोण्यांमध्ये साठवलेला ४३ लाखांचा गुटखा जप्त

Next

वसमत : लॉकडाऊनच्या काळावर नजर ठेऊन तस्करांनी गुटख्याचा अवैध साठा करणे सुरु केले आहे. याचा प्रत्येय वसमत येथे आला असून पोलिसांनी कबुतरखाना परिसरातील एका गोदामावर गुरुवारी रात्री कारवाई करत तब्बल १०० गोण्या भरून गुटखासाठ जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून गुटखा आणि टेम्पो असा जवळपास ४३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांना वसमत शहरातील कबुतरखाना भागातील एका गोदामामध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणात साठवणुक केली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड, उपनिरीक्षक  बी एस खार्डे,जी. एस. बर्गे, जमादार कृष्णा चव्हाण, प्रेमदास चव्हाण, शंकर हेंद्रे, भगीरथ सवांडकर यांच्यासह गोदामावर मध्यरात्री   छापा मारला.  यावेळी गोदामातून गुटख्याच्या शंभर पोत्यांसह एक ऑटो (क्र.एमएच-25-पी-2799) जप्त करण्यात आला. या प्रकरणी मुजाहित पठाण आणि   जाफर सय्यद बाबु (रा. वसमत) यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

तथाकथित पांढरपेशांना इशारा
अवैध व्यवसायकरून जनतेला लुटण्याचे मनसुबे काही तथाकथित प्रतिष्ठितांनी आखले आहेत. अशा पडद्याआड राहून गुटखा, दारू विक्री करून अनेकांची घरे उद्धवस्त करणाऱ्यांना धडा शिकवणार आहे. आता शहरातील अवैध दारूसाठ्याचा शोध घेण्यात येईल
- शिवाजी गुरमे, पोलीस निरीक्षक 

Web Title: Smugglers also prepare for lockdown; 41 lakh gutka stored in 100 sacks seized in Wasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.