शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही काय आयुष्यभर शेतातच राबायचे? कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांकडूनही पेन्शनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 14:58 IST

शेतकरीही करु लागले पेन्शनची मागणी

- अरूण चव्हाणजवळा बाजार: संप केल्यावर मागणी मान्य होत असेल तर आमचा त्यास विरोध नाही. पण कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय घोडे मारले? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करून आम्हालाही शासनाने १० हजार रुपये पेन्शन द्यावी, अशी मागणी केली आहे.

शासकीय कर्मचारीवर्गाला जुनी पेन्शन लागू करावी व इतर मागण्यांसाठी १४ मार्चपासून संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची शासकीय कामे खोळंबली आहेत. खरीप हंगाम अतिवृष्टीच्या पाण्यात गेला. रबी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव म्हणावा तसा मिळत नाही. तरीही शेतकरी आनंदी आहे. आता शेतकरी गप्प बसणार नाही. दोन पैसे कोणाला मिळत असतील तर आम्ही विरोध करणार नाहीत. पण शेतात राबून, उसनवारी करून पोट भरत नसेल तर शेतकरी आता शांत बसणार नाही. आम्हाला काय पैसे नको आहेत का? असा सवाल करून शेतकऱ्यांनी महिन्याकाठी दहा हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांची मुले शिकून मोठी होतात. त्यात आम्हाला आनंद आहे. पण आमचीही मुले शिकली पाहिजेत, असे वाटते. पण शेतकऱ्यांकडे पैसा नाही म्हणून मुले-मुली शेतातच राबतात. आता शेतकरी जागा झाला आहे. शासनाकडे पैसा आहे. तो पैसा कर्मचाऱ्यांना देण्यासाठी असेल तर शेतकऱ्यांनाही द्यायला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे.

शेतकरी जगला तर देश जगेल...सरकार सर्वांचे आहे. ते कोणावरही दुजाभाव करत नाही. कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली तर आमचीही मागणी मान्य करावी.- दिलीप राखोंडे, शेतकरी

वेळ प्रत्येकावरच येत असते. शेतकरी तर उसनवारीत जीवन जगत आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. आम्हाला पण पेन्शन द्यायला काहीच हरकत नाही.- माणिक सावंत, शेतकरी

शेतकऱ्यांना कधीच सुख मिळत नाही. सतत तो संकटाला सामोरे जात असतो. हंगाम संपला तरी काहीच पदरात पडत नाही. सरकारने शेतकऱ्यांनाही मानधन द्यावे.-सुरेश सुदाम चव्हाण, शेतकरी

शेतकरी भोळाभाबडा आहे. सकाळी उठून पिकाला पाणी देण्यासाठी जातो. साधी सायकल घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली तर शेतकऱ्यांनाही दहा हजार रूपये मानधन द्या.- पाडुरंग मारोतराव शेळके, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनHingoliहिंगोली