धक्कादायक ! वेडाच्या भरात मावशी व आजीचा कुऱ्हाडीने वार करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 13:41 IST2021-03-20T13:39:12+5:302021-03-20T13:41:58+5:30

Murder of Aunt and Grandmother in Hingoli मारहाणीत मावशीचा जागीच मृत्यू झाला तर आजीने रुग्णालयात नेताना प्राण सोडले

Shocking! In a fit of rage, he killed his aunt and grandmother with an ax | धक्कादायक ! वेडाच्या भरात मावशी व आजीचा कुऱ्हाडीने वार करून खून

धक्कादायक ! वेडाच्या भरात मावशी व आजीचा कुऱ्हाडीने वार करून खून

ठळक मुद्देवेडाच्या भरात आजी व मावशीचे हातपाय बांधले त्यानंतर आरोपीने कुऱ्हाडीने मारहाण करण्यात सुरवात केली. 

पुसेगाव (जि. हिंगोली) : वेडाच्या भरात एकाने मावशी व आजीचा खून केल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे घडली. आरोपीने मावशी व आजीचे हातपाय बांधून त्यांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याचे घटनास्थळावरून दिसून येत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिदास नंदूलाल चऱ्हाटे वय (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. रोहिदास चऱ्हाटे हा मनोरूग्ण स्वभावाचा असून आजी देविकाबाई दशरत पहारे (वय ८०) यांच्याकडे गावाजवळील एका शेतातील शेडमध्ये राहत होता. तर मावशी मंगलबाई उत्तम बशीरे (वय ४५ रा. परभणी) ही पुसेगाव येथे आली होती. २० मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास रोहिदास चऱ्हाटे याने वेडाच्या भरात आजी व मावशीचे हातपाय बांधून त्यांना कुऱ्हाडीने मारहाण करण्यात सुरवात केली. 

यात मावशी मंगलबाई उत्तम बशीरे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आजी देविकाबाई पहारे जखमी झाल्याने त्यांना हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, सपोनि सुनिल गिरी, पो.उप.नि. अशोक कांबळे, जमादार पोटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. दुपारपर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता.

Web Title: Shocking! In a fit of rage, he killed his aunt and grandmother with an ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.