धक्कादायक ! चालकाने ट्रकला गळफास घेऊन केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 12:49 IST2021-11-19T12:48:32+5:302021-11-19T12:49:39+5:30
संजय हनवते यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

धक्कादायक ! चालकाने ट्रकला गळफास घेऊन केली आत्महत्या
वसमत ( हिंगोली ) : नांदेड मार्गावरील कन्हेरगावाजवळ एका चालकाने स्वतःच्या ट्रकलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली आहे. संजय शामराव हनवते ( ४५ ) असे मृत चालक-मालकाचे नाव आहे.
संजय शामराव हनवते यांच्या मालकीचा एक ट्रक (क्र. एमएच २० ईजी ५७३० ) असून ते स्वतः चालक आहेत. आज सकाळी वसमत-नांदेड मार्गावरून ते प्रवास करत होते. सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान कन्हेरगावजवळ संजय हनवते यांनी अचानक स्वतःच्या ट्रकच्या मागच्या बाजूस वायरने गळफास घेतला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवली. वसमत ग्रामीण पोलीसचे सपोनि विलास चवळी, अविनाश राठोड इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. संजय हनवते यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.