कनेरगाव, फाळेगाव परिसरात शिवसेनेचे संपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST2021-07-17T04:24:04+5:302021-07-17T04:24:04+5:30

हिंगोली जिल्ह्यातील मौजे खंडाळा, देवठाणा, फाळेगाव आणि कनेरगाव या गावात शिवसंपर्क अभियानांतर्गत आ. बांगर यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन शिवसेनेचे ...

Shiv Sena's liaison campaign in Kanergaon, Phalegaon area | कनेरगाव, फाळेगाव परिसरात शिवसेनेचे संपर्क अभियान

कनेरगाव, फाळेगाव परिसरात शिवसेनेचे संपर्क अभियान

हिंगोली जिल्ह्यातील मौजे खंडाळा, देवठाणा, फाळेगाव आणि कनेरगाव या गावात शिवसंपर्क अभियानांतर्गत आ. बांगर यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन शिवसेनेचे आचार विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी जीव तोडून काम करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, डॉ. प्रीतम सरकटे, गजानन गावंडे, राजू उगले, बबन उगले, सीताराम माऊली, संदीप तनपुरे, माधव पाटील आडगावकर, सदाशिव इंगोले, लक्ष्मण वाडे, लिंबाजी पठाडे, संजय जाधव, गंगाधर गुठे, अवचार, सुधाकर राठोड, दशरथ पठाडे, प्रकाश मुटकुळे, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील ज्येष्ठ मंडळी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's liaison campaign in Kanergaon, Phalegaon area