शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना ही आई, आईशी गद्दारी करणाऱ्यांना ठेचा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

By विजय पाटील | Updated: March 18, 2024 16:41 IST

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या अशा गद्दारांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

वसमत : आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत. आम्ही जनतेची सेवा करणारे सेवक आहोत. तेव्हा आम्हाला लुबाडून राज्य करू नका. सध्याचे सरकार हे पळपुटे सरकार आहे. शिवसेना आई आहे. या आईशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही येथेच ठेचा असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

वसमत येथे १८ मार्च रोजी कुटुंब संवाद दौऱ्यात ते बोलत होते. मंचावर खा.संजय राऊत, खा.संजय जाधव, माजी खा सुभाष वानखेडे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, नागेश आष्टीकर, सुनील काळे, कन्हैया बाहेती, डॉ. पार्डीकर,श्रीनिवास पोराजवार आदी उपस्थित होते. भाजपा सरकार हे पक्षचिन्ह चोरणारे सरकार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अशा गद्दार पक्षाला आपण निवडून देऊ नका. भाजपवाल्यांनी प्रामाणिकपणा विकला आहे, हे लक्षात ठेवा. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या अशा गद्दारांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेचा वापर करुन भाजप सरकार खंडणी जमा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हळद संशोधन केंद्र मी मंजूर केले. बघा जनता तुम्हाला हळद लावते का? असा घनाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना पक्ष फोडीचे लायसन्स देवून टाका. ते घरफोडे नेते असून त्यांना कमळाऐवजी हातोडा निवडणूक चिन्ह द्या, असा टोला लगावला.

''पन्नास खोके एकदम ओके'' यापूर्वी आपण म्हणायचे ते बरोबरच आहे. यांनी पन्नास खोके घेऊनच भाजपासोबत गेले आहेत. ही गद्दार मंडळी पुढे कोणाच्याही कामाला येणार नाही. तेव्हा आताच यांना इथेच ठेचा, असेही ते म्हणाले.

..मग तुमचा पक्ष शिल्लक राहतो का बघा...शिवसेनेला ज्यांनी सोडले ते आता मावळे राहिले नाहीत. कावळे झाले आहेत, अशा गद्दारांना येत्या लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्या चित करा. सध्याचे भाजपा सरकार ईडी, सीबीआयचा धाक दाखवून पक्ष फोडत आहेत. तर सत्ता आमच्या हाती येणार आहे. तेव्हा तुमाचा पक्ष शिल्लक राहतो का बघा. शक्तीशाली आहोत असे समजत असले तरी जनता काही दुधखुळी नाही. ती तुम्हाला रस्त्यावर आणण्याशिवाय राहणार नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी भाजपा सरकारवर केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेHingoliहिंगोलीShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४