शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत शिंदेसेनेने भाजपचे २ उमेदवार फोडले; आरोप-प्रत्यारोपानंतर निवडणूकीत धक्कातंत्र

By प्रसाद आर्वीकर | Updated: November 22, 2025 13:04 IST

शिंदेसेनेने भाजपचे दोन उमेदवार फोडून वापरलेल्या धक्कातंत्राने हिंगोली येथील निवडणूक चांगलीच चर्चेत येत आहे.

हिंगोली : राज्यात सत्तेत असलेले भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आतापर्यंत एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीत रंगत भरली होती. मात्र शिंदेसेनेने भाजपचे दोन उमेदवार फोडून वापरलेल्या धक्कातंत्राने हिंगोली येथील निवडणूक चांगलीच चर्चेत येत आहे.

जिल्ह्यात ३ पालिकांच्या निवडणुका होत आहेत. सुरुवातीच्या काळात महायुती की स्वतंत्र निवडणूक लढवायची याबाबत संभ्रम होता. मात्र तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे सत्तेतील पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगत आहे.

हिंगोलीच्या नगराध्यक्षपदाच्या जागेवर भाजपचा दावा सांगितला जात असताना आमदार संतोष बांगर यांनी येथील निवडणुकीत उडी घेऊन शिंदेसेनेच्या वतीने नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे केले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेत सुरुवातीपासूनच वादाची ठिणगी पडली. त्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार संतोष बांगर आणि आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यात अनेक वेळा आरोप-प्रत्यारोप झाले. हिंगोलीत युती होईल, अशी भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती. मात्र आतापर्यंत तरी तशा कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. उलट भाजपचे उमेदवार फोडून त्यांना शिंदेसेनेत प्रवेश देण्याचे धक्कातंत्र आमदार संतोष बांगर यांनी अवलंबले आहे. असे दोन धक्के भाजपला सहन करावे लागले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपानंतर आता धक्कातंत्राने येथील निवडणूक चर्चेत येत आहे.

शिंदेसेनेतून भाजपात; पण उमेदवारी नाकारलीवसमतमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी, यासाठी ऐनवेळी शिंदेसेनेतून डॉ. एम. आर. क्यातमवार हे भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या पत्नी सविता मारोती क्यातमवार यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी भाजपतर्फे माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांच्या पत्नी सुषमा शिवदास बोड्डेवार यांना भाजपची उमेदवारी जाहीर केली.

अखेरच्या दिवशी ८२ अर्ज माघारीनामनिर्देशनपत्र माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तिन्ही नगरपालिकांतून ८२ जणांनी माघार घेतली आहे. त्यात नगराध्यक्षपदाच्या ८ आणि नगरसेवकपदाच्या ७४ उमेदवारांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli: Shinde's Sena poaches BJP candidates, election heats up.

Web Summary : Hingoli municipal elections see BJP, Shinde Sena, and NCP factions competing. Shinde Sena poached two BJP candidates, creating tension. Internal disputes and candidate withdrawals add to the election drama.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकHingoliहिंगोलीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा