औंढ्यात शाहिरी जलसाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:28 IST2018-10-30T00:28:10+5:302018-10-30T00:28:31+5:30
शहरात २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६२ व्या धम्मचक्र पर्वतन दिनानिमित्त भव्य शाहिरी जलसाचे आयोजन सम्राट युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजन केले होते.

औंढ्यात शाहिरी जलसाला प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : शहरात २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६२ व्या धम्मचक्र पर्वतन दिनानिमित्त भव्य शाहिरी जलसाचे आयोजन सम्राट युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजन केले होते.
उद्घाटक जि.प.सदस्य अजित मगर तर अध्यक्षस्थानी रामभाऊ मुळ, स्वागताध्यक्ष नगरसेवक सुमेध मुळे,. मुख्य प्रवर्तक डिगु बायस होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मोतीराम राठोड, जया देशमुख, अलका कुरवाडे, विजयमाला राम मुळे, राजू घनसावंत उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण घोंगडे यांनी केले. यावेळी प्रा.रमेश वाव्हळे, पट्टेबहादुर, अॅड.स्वप्नील मुळे, पांडुरंग धवसे, गौतम घोंगडे,मुकूंद घनसावंत, सरोदे उपस्थित होते. यासाठी आकाश सुतारे, आशिष मुळे, अविनाश मुळे, राजेश खंदारे, अलंकार मुळे, यशवंत साळवे, आकाश जाधव, प्रवीण मुळे, प्रवीण खंदारे, नितिन मुळे, सागर मुळे, गौतम पाईकराव, देवनाद मुळे, राकेश पवार, विजय जाधव, संदीप सुतारे, शुभम मुळे, सचिन मुळे, पवन मुळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. महिलांचीही मोठी उपस्थिती असल्याचे दिसत होते.