शेवाळा येथे उपसरपंचपदी सीमा सावंत यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:55 IST2021-02-18T04:55:32+5:302021-02-18T04:55:32+5:30

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत अभय सावंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकता विकास पॅनलखाली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यात आली. या ...

Seema Sawant elected as Deputy Panch at Shewala | शेवाळा येथे उपसरपंचपदी सीमा सावंत यांची निवड

शेवाळा येथे उपसरपंचपदी सीमा सावंत यांची निवड

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत अभय सावंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकता विकास पॅनलखाली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यात आली. या पॅनलला १३ पैकी ११ जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदाचे आरक्षण एसटी प्रवर्गासाठी आरक्षीत असल्याने तसेच यामध्ये त्या आरक्षणाचा उमेदवार नसल्याने सरपंच पदाची जागा रिक्त असल्याने अखेर १७ फेब्रुवारी उपसरपंचपदी सिमा सावंत यांची निवड झाली. ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आर. व्ही. सावंत, मंडळ अधिकारी व्ही. के. काळे, प्रशासक पशु वैद्यकीय पर्यवेक्षक, तलाठी व्ही. एन. ठाकरे, ग्रामविकास अधिकारी पी. डी. जाधव यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी एकमताने सिमा संजय सावंत यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी डॉ. अरुण सावंत, डॉ. कैलास सावंत, अभय सावंत पाटील, अशोकराव सुर्यवंशी, विलास सावंत, शे. इलियास, शे.जाबेर बागवान, प्रशांत रणखांब, पंजाबराव सावंत, जीवन शिंदे, धोंडबा सावंत यांच्यासह ग्रामस्थांची माेठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. फाेटाे नं. १३

Web Title: Seema Sawant elected as Deputy Panch at Shewala