शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
3
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
4
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
5
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
6
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
7
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
8
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
9
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
10
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
11
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
12
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
13
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
14
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
15
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
16
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
17
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
18
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
19
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
20
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया आॅफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:29 PM

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. वारंवार होणारा इंटरनेटमधील खोडा याला कारणीभूत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. वारंवार होणारा इंटरनेटमधील खोडा याला कारणीभूत आहे. त्यामुळे गतवर्षीपासून आॅफलाईनद्वारेच अर्ज प्रक्रिया सुरू आहे.महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे गतवर्षीपासून शिष्यवृत्ती योजनेची माहिती आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याण विभागातर्फे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून खबदारी घेतली जात आहे. शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर आॅनलाईन पद्धतीने भरण्याच्या सूचना शासनाकडून यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. परंतु पोर्टलमधील वारंवार बिघाडामुळे आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. आॅफलाईन पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांची माहिती भरताना वारंवार होणारा इंटरनेटमधील खोडा यामुळे विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली. परंतु आता शिष्यवृत्तीसाठी आॅफलाईन पद्धतीने माहिती स्वीकारली जाणार आहे.जबाबदार : कार्यशाळेस उपस्थिती बंधनकारक२०१८-१९ या वषार्तील शिष्यवृत्ती करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी कार्यशाळेस उपस्थित राहणे बंधनकार आहे. विद्यार्थी वंचित राहिल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील.अशा सूचनाही परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. औंढा पंचायत समिती १० सप्टेंबर, सेनगाव पं. स. ११ सप्टेंबर, वसमत पं. स. १२ सप्टेंबर, कळमनुरी पं.स. १४ सप्टेंबर तर हिंगोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कार्यशाळा होणार आहे.सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, भारत सरकार मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती, तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाºया पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीSchoolशाळा