ऑनलाइन प्रक्रियेमुळे भावी उमेदवारांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:26 IST2020-12-24T04:26:56+5:302020-12-24T04:26:56+5:30

औंढा नागनाथ : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरावे लागत आहेत. यातील किचकट अटी व ...

The rush of prospective candidates due to online process | ऑनलाइन प्रक्रियेमुळे भावी उमेदवारांची धांदल

ऑनलाइन प्रक्रियेमुळे भावी उमेदवारांची धांदल

औंढा नागनाथ : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरावे लागत आहेत. यातील किचकट अटी व नियमांमुळे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी एकाही इच्छुकास आपले नामनिर्देशनपत्र दाखल करता आले नाही.

औंढा नागनाथ तहसील कार्यालयात २३ टेबलवर ग्रामपंचायत उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी २३ डिसेंबर राेजी दिवसभरात एकही नानिर्देशपत्र दाखल झाले नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरणे गरजेचे आहे. यामध्ये विविध कागदपत्रे, जात वैधता प्रमाणपत्र, खर्च करण्यासाठी नवीन बँक बचत खाते यासह विविध बाबींचा समावेश आहे. त्यामुळे ही सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी उमेदवार धावपळ करत आहेत. तसेच शहरातील सर्वच ऑनलाइन सेंटरवर उमेदवार गर्दी करीत असल्याचे दिसून आले; परंतु पहिल्या दिवशी एकाही इच्छुक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही.

Web Title: The rush of prospective candidates due to online process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.