शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे १६ कोटी ९७ लाखांचे चुकारे लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:34 IST

दरवर्षी नाफेड केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या चुका-याची प्रतीक्षा करण्याची वेळ कायम आहे. आता तर चक्क १६ कोटी ९७ लाख ६७ हजार ५०० रुपयाचे चुकारे लटकलेले असल्याने शेतक-यांची यंदाही चुका-यासाठी गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षी नाफेड केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या चुका-याची प्रतीक्षा करण्याची वेळ कायम आहे. आता तर चक्क १६ कोटी ९७ लाख ६७ हजार ५०० रुपयाचे चुकारे लटकलेले असल्याने शेतकºयांची यंदाही चुका-यासाठी गैरसोय होत आहे.नाफेडच्या खरेदी केंद्रावर अनेक वर्षापासून तूर विक्री केल्याचे चुकारे उशिराने मिळत असल्याचीच भावना शेतकºयांना होऊन बसली आहे. एक तर या ठिकाणी तूर विक्रीस आल्यानंतर नाफेडच्या नियमानुसार खरेदी होत असून, कधी कधी तर दहा ते बारा किलोही तुरी शेतकºयांना वापस न्यावा लागतात. मात्र उशिरा का होईना; तुरीला हमी भाव मिळत असल्याने शेतकरी या ठिकाणी तुरी विक्रीसाठी घेऊन येतात. दोन वर्षापासून काही प्रमाणात पर्जन्यमान योग्य असल्याने शेतकºयांना तुरी किलोऐवजी क्विंटलात होत आहेत. मात्र उशिरा का होईना हमी भावाप्रमाणे तूर खरेदीचे चुकारे मिळत असल्याने शेतकरी यात समाधानी आहेत. अद्याप पर्यंत नाफेडच्या गोदामामध्ये जिल्ह्यातील पाचही केंद्रावर ३७ हजार ७३०.३३ क्विंटल तूर गेली आहे. यातील काही शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्णत्वास गेली असून, त्या-त्या शेतकºयाच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन असल्यामुळे कीचकट झाली. परंतु यावरही तोडगा काढून शेतकºयांना तूरीचे चुकारे देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कापुरे यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसांत उर्वरित शेतकºयांनाही चुकारे मिळण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १९०० कोटी रुपयाची मागणी केली आहे. त्यानुसार महाराष्टÑासाठी ६०० कोटी मंजूर झाले आहेत व येत्या पंधरा दिवसाच्या आत शेतकºयांच्या खात्यावर तुरीचे चुकारे पडतील असे मुख्यमंत्र्याने सांगितले आहे. तशी तूर विक्री केलेल्या शेतकºयांच्या कागदपत्राची तपासणी करणे सुरु आहे. अद्यापपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील शेतकºयांना ८६ लाख ५३ हजार ५८० रुपये वाटप झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक एम. डी. कापुरे यांनी सांगितले. तर अजूनही शेतकºयांना चुकारे वाटप करणे सुरुच असल्याचे ते सांगत होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMONEYपैसाFarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजारMarket Yardमार्केट यार्डAgriculture Sectorशेती क्षेत्र