रोहित्राचे खांब बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:35 IST2018-08-26T00:34:53+5:302018-08-26T00:35:12+5:30
हिंगोली तालुक्यातील बळसोंड येथील पंढरपूरनगरातील रोहित्राचे खांब अनेक दिवसांपासून वाकले होते. त्यामुळे रोहित्र कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत महावितरणने हे खांब बदलले आहेत.

रोहित्राचे खांब बदलले
लोकमत न्यूज नेटवर्क
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बळसोंड येथील पंढरपूरनगरातील रोहित्राचे खांब अनेक दिवसांपासून वाकले होते. त्यामुळे रोहित्र कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत महावितरणने हे खांब बदलले आहेत.
या रोहित्राचे खांब वाकल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रोहित्राचे खांब वाकल्याने तारा लोंबकळल्या होत्या. कधी जोराचा वारा सुटल्यास तारांचे घर्षण होऊन आगीचे लोळ पडत होते. नागरिकांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही दखल घेतल्या जात नसल्याने ग्रामस्थांनी हात टेकले होते. सध्या पाऊस पडत असल्याने दिवसेंदिवस हे खांब अधिकच वाकत होते. मोठ्या अपघाताचा धोका लक्षात घेता ‘लोकमत’ने ‘रोहित्र वाकल्याने अपघाताचा धोका’ या मथळ्याखाली वृत्त ८ आॅगस्ट रोजी प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीने २२ आॅगस्ट रोजी या रोहित्राचे खांब बदलले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून लोकमतचे आभार मानले आहे.