कळमनुरी येथे माकपतर्फे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:58 IST2018-06-10T23:58:10+5:302018-06-10T23:58:10+5:30
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माकपच्या वतीने १० जून रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान जुन्या बसस्थानकाजवळ एक तास रास्तारोको करण्यात आला.

कळमनुरी येथे माकपतर्फे रास्ता रोको आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माकपच्या वतीने १० जून रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान जुन्या बसस्थानकाजवळ एक तास रास्तारोको करण्यात आला.
शेतकºयांचे सर्व कर्ज माफ करून नवीन कर्ज वाटप करा, नवहक्क कायद्याची अमलबजावणी करा, गायरान जमिनी कसणाºयांच्या नावे करा, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना ४० हजार रुपयांचे अनुदान द्या, हरभरा व तुरीची नाफेडमार्फत खरेदी करा, निराधारांना २ हजार रुपये मानधन द्या, आदी मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते यांना देण्यात आले. यावेळी कॉ. सुरेश काचगुंडे, कॉ. स. अझर अली. एकनाथ हुंबे, चंपतराव नाईक, हरिभाऊ दुधाळकर, बाबूराव गाडे, रुस्तूम राठोड, विजय भालेराव, बबन धुळे, उत्तम पुंडगे, विश्वनाथ गुठ्ठे आदी उपस्थित होते. हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर जुन्या बसस्थानकाजवळ रास्ता रोको करण्यात आला. वाहतूक सेवा विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्पमुळे अनेक वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.