लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : राकाँच्या तीन नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्याकडे ६ आॅक्टोबर रोजी दिले आहेत.राजीनामा पत्रात नमुद आहे की, न.प.च्या अंतर्गत वादा संदर्भात गटनेता व शहराध्यक्षाविरोधात पक्षाकडे तक्रारीचे पत्र दिले होते. पक्षाने या पत्राची चौकशी न करता पुन्हा त्यांनाच गटनेता व शहराध्यक्ष पद बहाल केली आहेत. पक्ष स्थापनेपासून पक्षासोबत आम्ही आहोत. आमच्यावर अन्याय होत आहे. नगरसेवक हुमायून नाईक हे शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष असताना पक्षात गटातटाचे राजकारण नव्हते. गटनेता व शहराध्यक्ष न.प. च्या सर्वसाधारण सभेत पक्षाच्या नगरसेवकांना सोबत न घेता सेनेसोबत राहत आहेत. पक्षाच्या सदस्याविरूद्ध या दोघांनी तक्रारही केली आहे.पक्ष या दोघांची पाठराखण करत आहे. सेनेचे नगराध्यक्ष व काँग्रेसच्या नगरसेविका विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या संदर्भात सेनेकडून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी हे दोघे सेनेसोबत होते. सेनेने काढलेल्या मोर्चातही हे दोघे हजर होते. या कारणास्तव राजीनामे देत असल्याचे राजीनामा पत्रात नमुद आहे. नगरसेवक हुमायून नाईक, म. नाजीम रजवी, रुक्साना शाहीन अ. समद यांनी राजीनामे दिले आहेत. या तिघांच्या राजीनामापत्रात स्वाक्षऱ्या आहेत. रजिष्टर्ड पोष्टाने या तिघांनी राजीनामे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविले आहेत.
राकाँच्या नगरसेवकांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:18 IST