कुरुंदा येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:48+5:302021-02-05T07:54:48+5:30

नरहर कुरुंदकर विघालय कुरुंदा : येथील नरहर कुरुंदकर विद्यालयात प्राचार्य बबनराव कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. ...

Republic Day celebrations at various places in Kurunda | कुरुंदा येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

कुरुंदा येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

नरहर कुरुंदकर विघालय

कुरुंदा : येथील नरहर कुरुंदकर विद्यालयात प्राचार्य बबनराव कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव मुंजाजीराव इंगोले, माजी सभापती चंद्रकांत दळवी, रंगराव कदम, शेख. फारुख, इब्राहीम खा पठाण, श्याम पांडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

कुरेशी उर्दू विघालय कुरूंदा

एन. एम. कुरेशी उर्दू ज्युनिअर कालेज मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मूकसीत कामले यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्राचार्य शेख ऐजाज, मसरूर अहमद खान, ग्रा. प. सदस्य मुफ्ती कलीम , शेख मुखीद, शेख साबेर, हाजी सय्यद वहिद, हाजी शेख नूर, माजी सरपंच शेख, छोटू आदींसह शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कुरुंदा जिल्हा परिषद हायस्कूल

कुरुंदा : जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मुख्याध्यापक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपयाचे बक्षीस बालरोगतज्ञ डॉ. सदाशिव चोंढे यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी बाबुराव दळवी, डॉ. कैलास बारे, विश्वभर सोनटक्के, गंगाधर महाराज, नारायण आवसरमले, दिलीप सोनटक्के, ॲड. सुर्यतळ सह अनेकांची उपस्थिती होती. फाेटाे नं. १०

Web Title: Republic Day celebrations at various places in Kurunda