‘४२ शिक्षकांचे बदली प्रस्ताव पुन्हा तपासा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:26 IST2018-08-18T00:26:19+5:302018-08-18T00:26:48+5:30
पती-पत्नी एकत्रिकरण, एकल महिला व इतर कारणांनी बदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असलेल्या ४२ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. अशा शिक्षकांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

‘४२ शिक्षकांचे बदली प्रस्ताव पुन्हा तपासा’
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पती-पत्नी एकत्रिकरण, एकल महिला व इतर कारणांनी बदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असलेल्या ४२ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. अशा शिक्षकांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रिकरण, दिव्यांग, दिव्यांगांचे पालक आदी कारणांनी झालेल्या बदल्यांची फेरतपासणी झाली होती. त्यात अंतर कमी आढळलेल्या अनेकांना अपात्र केले होते. तर अनेकांनी पती-पत्नी एकत्रिकरणात बदली योग्य ठिकाणी झाली नसल्याची तक्रार केली होती. अनेक विस्थापित शिक्षक-शिक्षिकांचा यात रोष होता. अशा तब्बल ४२ पेक्षा जास्त शिक्षकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. अंतराची तपासणी जागेवरच झाली असली तरीही प्रमाणपत्रातील शंकेची तपासणी होणे बाकी आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातच अनेक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्याने शिक्षण विभाग आता अशा शिक्षकांचे प्रस्ताव फेरतपासणी करण्याच्या कामात गुंतला आहे.