Removed the cash in the pocket | खिशातील रोकड घेतली काढून
खिशातील रोकड घेतली काढून

हिंगोली : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात अ‍ॅटोपॉईंटजवळ एका इसमाच्या खिशातील रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भानखेडा येथील संदीप विलास राठोड यांच्यासोबत दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी दमदाटी करून त्यांच्या खिशातून बळजबरीने १० हजार रुपये काढून घेतले. आरोपींनी राठोड व त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यास मारहाण करून दुचाकीवरून पळ काढला. या प्रकरणी संदीप राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title:  Removed the cash in the pocket
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.