लसीकरणासाठी ‘कोविन’ ॲपवर नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST2020-12-24T04:27:07+5:302020-12-24T04:27:07+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी जागतिक ...

Registration on the ‘Covin’ app is mandatory for vaccination | लसीकरणासाठी ‘कोविन’ ॲपवर नोंदणी बंधनकारक

लसीकरणासाठी ‘कोविन’ ॲपवर नोंदणी बंधनकारक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे औरंगाबाद विभागाचे सर्वेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ. मुजीब सय्यद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गित्ते, उपविभागीय अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आय. एम. ए, आय.पी.ए., निमा संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेत काम करणारे शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, अधिकारी - कर्मचारी यांना कोविडची लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे. यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या यंत्रणेला आदेश देऊन त्याचे नियोजन करावे. तसेच या लसीकरणासाठी लसीकरणाचे ठिकाण लसीकरणासाठी लागणारे कर्मचारी यांच्या नियुक्तीचे आदेश यावेळी दिले.

प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० लोकांना लस देण्याचे नियोजन असून त्याप्रमाणे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे निश्चित करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तसेच प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष स्थापन करावे. तसेच या केंद्रावर हॅन्ड सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. लसीकरणासाठी टोकन पध्दत अवलंबविण्यात यावी. तसेच प्रत्येक केंद्रावरील निरुपयोगी साहित्याची तत्काळ विल्हेवाट लावावी. तालुका स्तरावर टास्क फोर्सची दर शुक्रवारी बैठका घेऊन वेळोवेळी आढावा घेण्याचे सांगितले.

या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे औरंगाबाद विभागाचे सर्वेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ. मुजीब सय्यद यांनी कोविड विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तीन टप्प्यात लसीकरण करण्याचे नियोजन असून कोविन ॲपद्वारे रुग्णांची नोंद करणे, एसएमएस देणे, माहिती संकलित करणे तसेच लसीकरणाविषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

Web Title: Registration on the ‘Covin’ app is mandatory for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.