रेल्वे स्थानकावरही होणार प्रवाशांची रॅपिड ॲंटिजन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST2021-03-15T04:27:34+5:302021-03-15T04:27:34+5:30
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. तसेच बाहेरगावाहून बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची ...

रेल्वे स्थानकावरही होणार प्रवाशांची रॅपिड ॲंटिजन तपासणी
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. तसेच बाहेरगावाहून बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड ॲंटिजन तपासणीच्या सूचना आहेत. शिवाय रेल्वे स्थानकावरही पथक नियुक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बसस्थानकावर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र रेल्वे स्थानकावर या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. अखेर १४ मार्चपासून आरोग्य विभागाने रेल्वे स्थानकावर डॉ. अझहर देशमुख यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. या पथकामार्फत प्रवाशांची रॅपिड ॲंटिजन टेस्ट करण्यास सुरवात झाली. या पथकामध्ये डॉ. देशमुख यांच्यासह पौर्णिमा पंडित, गंगा कळासरे, अनुपमा तिगोटे, सुजाता इंगोले, वसंत पवार, सुमित्रा शिखरे, कविता खंदारे, सविता इंगळे, अनिता चोंडेकर, अनुराधा महाजन आदींचा समावेश आहे.
फोटो न. २६