रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:12 IST2018-11-16T00:11:48+5:302018-11-16T00:12:20+5:30

तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकºयावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने सदरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.१४ नोव्हेंबर रोजी हळदीच्या पिकाला पाणी देत असताना ही घटना घडली.

 Randukar Farmer Attack | रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकºयावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने सदरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.१४ नोव्हेंबर रोजी हळदीच्या पिकाला पाणी देत असताना ही घटना घडली.
हळदीच्या पिकात लपलेल्या रानडुकराने विनायक रामराव कामखेडे यांच्यावर अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात कामखेडे यांच्या पायाला जबर जखम झाली आहे. कामखेडे यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या शेतकºयांनी तात्काळ धाव घेत कामखेडे यांना येलदरी येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात आणले. यात कामखेडे यांच्या पायाला चार टाके पडले असून जबर मुका मार लागला आहे. या घटनेमुळे येलदरी धरणाखालील पूर्णा नदीकाठच्या शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या अधिकाºयांनी रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे. मागील पाच सहा वर्षांपासून येलदरी धरणाखालील पूर्णा नदीकाठच्या गावामधील शेतकºयांंना रानडुकरासह विविध प्रकारच्या वन्य प्राणाचा उपद्रव वाढला असून हे प्राणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत, याकडे वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title:  Randukar Farmer Attack