पोलीस अधिक्षक कार्यालयात रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 01:29 IST2018-08-25T01:28:53+5:302018-08-25T01:29:07+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या वतीने रक्षाबंधन सोहळा पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षकांना महिला अधिकाऱ्यांनी राखी बांधून हा सोहळा उत्साहात पार पाडला.

 Rakshabandan in the police superintendent's office | पोलीस अधिक्षक कार्यालयात रक्षाबंधन

पोलीस अधिक्षक कार्यालयात रक्षाबंधन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या वतीने रक्षाबंधन सोहळा पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षकांना महिला अधिकाऱ्यांनी राखी बांधून हा सोहळा उत्साहात पार पाडला.
हिंगोलीच्या पोलीस उपाधिक्षक गृहविभाग सुजाता पाटील यांच्या पुढाकारातून राखी पोर्णिमेच्या अगोदरच रक्षाबंधन सोहळा पार पडला आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर, प्रेमलता गोमासे, सुजाता पाटील यांनी राखी बांधली. तर गृहरक्षक दलाचे जवान व राखीव दलातील जवानांनाही महिला पोलीस कर्मचाºयांनी राखी बांधून नवे पर्व सुरू केले. पोलीस कर्मचारी नेहमी कर्तव्यात मग्न असतात. राखी पोर्णिमेला अनेकांना घरी जाता येत नाही. त्यामुळे कर्मचाºयांना राखी पोर्णिमेसारख्या घरगुती सणाचा आनंद लुटता आला.

Web Title:  Rakshabandan in the police superintendent's office